मुलीवर अत्याचार करून खून; आरोपी फरार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील सासाराम येथे पोलिसांना बुधवारी एका मुलीचा मृतदेह आढळला. या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला असल्याची शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली. मृत मुलीच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्याचे आढळले. 

ही मुलगी लोदी गावातील राहणारी आहे. मंगळवारी संध्याकाळी मागासवर्गीय मुलींना देण्यात येणारी स्कॉलरशिप घेण्यासाठी ती बँकेत गेली होती. ती एका स्थानिक विद्यालयात ११ वीला शिकते. या घटनेची माहिती मिळताच गावातील लोक गोळा झाले. Loading...
त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू करून दोषी खुन्याच्या अटकेची मागणी लावून धरली. पोलिस व प्रशासनाने त्यांची समजूत काढल्यानंतर गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाइकांच्या स्वाधिन केला. अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.