केंद्रातील आणि राज्यातील सरकारला जनता कंटाळली - आ.जगताप


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केंद्रातील आणि राज्यातील सरकारला जनता कंटाळली आहे. भाजपला सत्तेतून बाहेरचा मार्ग दाखविण्यासाठी युवक राष्ट्रवादीने काम केले पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात केल्याचे जनतेस युवकच्या कार्यकर्त्यांनी पटवून द्यावे. 


Loading...
खा. शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या माध्यमातून अजित पवार राज्यात जे काम करीत आहेत, त्याची माहिती बूथ कमिटीव्दारे घरोघरी पोचविण्यासाठी बूथ कमिटी मजबूत करणे गरजेचे आहे. युवक राष्ट्रीवादीने अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा केलेला संकल्प निश्चित सिद्धीस जाईल. असा विश्वास आमदार राहुल जगताप यांनी व्यक्त केला. 

कुकडी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पार पडलेल्या उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक बूथ कमिटी सक्षमीकरण संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, मतदार संघात काम करताना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य देवून काम करत आहे. 


स्व.कुंडलिकराव तात्या जगताप यांच्या आशीर्वादाने व आदरणीय शिवाजीराव नागवडे यांच्या मार्गदर्शनानुसार काम करत आहे. कोणतेही काम प्रत्यक्षात मंजूर झाल्याशिवाय त्याकामाचा नारळ फोडत नाही व यापुढेदेखील तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी काम करत राहिल.

युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते म्हणाले, बदलत्या राजकीय परिस्थितीत बूथ कमिट्यांना अनन्यसाधारण महत्व आले आहे. बूथ कमिट्यांचे काम गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम बूथ कमिटी सदस्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच आ.जगताप हे उत्साही व युवा नेतृत्व असून मोठ्या प्रमाणावर तालुक्यामध्ये विकास कामे त्यांनी केलेली आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.