१२ सप्टेंबरला लॉंच होणार नवा अॅपल आयफोन !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अॅपल याच वर्षी १२ सप्टेंबर रोजी त्यांच्या वार्षिक कार्यक्रमात तीन नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. या फोनची नावे आयफोन-९, आयफोन-११ आणि आयफोन ११ प्लस अशी असू शकतात. आयफोन-९ मध्ये मागील वर्षी लाँच झालेल्या 'आयफोन-एक्स' प्रमाणे फेस-आयडी (चेहरा पासवर्ड) असेल. 


Loading...
'द इन्क्वायरर' वेबसाइटच्या वतीने हा दावा करण्यात आला आहे. आयफोन-११ चे नाव 'आयफोन-एक्स-टू' असेही ठेवले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये अनेक नवीन फीचर्स जोडले जाण्याची शक्यता आहे. आयफोन-९ ची स्क्रीन एलसीडी आणि आयफोन - ११ तसेच आयफोन-११ प्लसची ओएलईडी असेल. अहवालानुसार काही फीचर सॅमसंगच्या गॅलेक्सी नोट-९ शी थोडेफार मिळणारे असतील. 

हे तिन्ही फोन फीचर मॉडेलमध्येच राहतील की महागड्या ओएलईडी मॉडेलमध्ये राहतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अहवालानुसार आयफोन-११ आणि ११-प्लसची निर्मिती सुुरू झाली आहे. आयफोन-९ ची निर्मिती सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आहे. 


जर्मनीतील वृत्तपत्र मेसरकॉफच्या एका अहवालानुसार वेबसाइटने हा दावा केला आहे. या वृत्तपत्रानुसार नवीन आयफोनची आगाऊ बुकिंग १४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे हे फोन १२ सप्टेंबर रोजी लाँच करणार असल्याचे मानले जात आहे. मागील वर्षी अॅपलने नवीन फोन १५ सप्टेंबर रोजी लाँच केले होते. त्या फोनची विक्री २२ सप्टेंबरपासून सुरू झाली होती.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.