नगर-मनमाड मार्गावर ढंपरची धडक बसून १४ मेंढ्या जागीच ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ढंपरची धडक बसून १४ मेंढ्या ठार, तर २० मेंढ्या गंभीर जखमी झाल्या. सुदैवाने मेंढपाळाचे प्राण वाचले. नगर-मनमाड मार्गावरील मुळा उजवा कालव्याजवळ बुधवारी रात्री साडेआठला ही घटना घडली. 


Loading...
पारनेर तालुक्यातील कण्हेर पोखरी येथील पोपट कोंडीबा हंडे हे मेंढ्या चारण्यासाठी कृषी विद्यापीठ परिसरात आले होते. मेंढ्याचा कळप पाठीमागे घेऊन जात असताना नगरकडून आलेला ढंपर कळपात घुसल्याने १४ मेंढ्याचा चेंदामेंदा झाला. २० मेंढ्या जखमी होऊन रस्त्यावर पडून राहिल्या.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.