बारामतीत अल्पवयीन मुलीची युवकाच्या छेडछाडीस कंटाळून आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :छेडछाडीला कंटाळून कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने जनावरांच्या अंगावरील गोचीड मारण्याचे विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. अकरा दिवसांपूर्वी तिने राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले होते. बारामतीतील खासगी रुग्णालयात बुधवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 
Loading...आकांक्षा प्रदीप दरेकर असे मुलीचे नाव आहे. छेडछाड करणाऱ्या महेश मासाळवर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनगावच्या महाविद्यालयात जाता-येता बसमध्ये महेश महिनाभरापासून आकांक्षाची छेड काढत होता. तिने याबाबत कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीयांनी महेशला दमही दिला. परंतु, त्याच्याकडून छेडछाड सुरूच होती. त्यामुळे आकांक्षाने अखेर विषारी द्रव्य प्राशन केले आणि बुधवारी तिचा मृत्यू झाला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.