अनधिकृत वाळूसाठ्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकास ४७ लाखांचा दंड.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगर शहरातील नालेगाव येथील महावीर होम्स या नावाने काम सुरू असलेल्या बांधकाम व्यावसायिकास अनधिकृतपणे १८४.५० ब्रास वाळूचा साठा केल्याप्रकरणी संबंधित व्यावसायिकास नगर तहसीलदारांनी ४६ लाख ७३ हजार ६०० रूपयांचा दंड केला आहे.

Loading...
याबाबत सविस्तर असे की, नालेगावात सर्व्हे नं ७६/२ मध्ये महावीर होम्स नावाने बांधकाम सुरू होते. या कामासाठी येथे तब्बल १८४.५० ब्रास वाळूसाठा केलेला आढळून आला होता. या साठ्याबाबत नालेगावच्या तलाठ्याने ११ /१० / २०१७ रोजी पंचनाम करून तसे तहसील कार्यालयास कळवले होते. तत्कालीन नगर तहसीलदारांनी याबाबत नोटीस देवून खुलासा करण्याचे कळवले होते. 

त्या अनुषगांने संबंधित बांधकाम व्यावसायिकाने दि.१९ / १२ / २०१७ रोजी खुलासा सादर करून ही नोटीस मान्य नसून, हा वाळूसाठा बांधकामासाठी केला असून ती सर्व वाळू खरेदी केली आहे. तसेच त्याबाबतच्या खरेदी पावत्या आपल्याकडे असल्याचे नमूद केले होते. 

तसेच पावत्यांच्या झेरॉक्सप्रती या सोबत जोडल्या होत्या.दरम्यान तत्कालीन तहसीलदरांची बदली झाली व सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने पुन्हा संधी देणे नैसर्गिक न्यायास अनुसरून दि.३ / ७ / २०१८रोजी सदरच्या वाळूसाठ्याबाबतच्या मूळ पावत्या व म्हणने मागविले होते. 

त्यानंतर महावीर होम्स नावाच्या संबंधित व्यावसायिकाने दि.७ / ७ / २०१८ रोजी सदरचा वाळूसाठा अधिकृत असून तो अधिकृत पावत्या घेवून खरेदी केल्याचे म्हटले होते. परंतु त्याबाबतच्या मुळ पावत्या त्यांनी कार्यालयास सादर सादर केल्या नाहीत.त्यामुळे परत दि.२५/७/२०१८ रोजी मूळ पावत्या मागवल्या मात्र मात्र त्या सादर केल्या नाहीत. 

तसेच ज्या झेरॉक्स पावत्या सादर केल्या होत्या,त्यावर महावीर होम्स व्यावसायिकाचे कुठेही नावाचा उल्लेख नव्हता. तसेच खरेदीदाराचे नाव पत्याऐवजी मोघमपणे अहमदनगर, पुणे, मुंबई किंवा दुसऱ्या व्यक्तीचे नाव नमूद केलेले आहे.

त्यामुळे दि.१३/८/२०१८ रोजी संबंधित आदेश पारित करून संबंधित व्यावसायिक हा वाळूसाठा अधिकृत असल्याचे सिध्द करू न शकल्यामुळे हा वाळूसाठा अनधिकृत असल्याचे गृहित धरून तहसील कार्यालयाने या व्यावसायिकास ४६ लाख ७३ हजार ६०० रूपयांचा दंडात्मक आदेश पारित केल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.