महानगरपालिका निवडणुकीची व्यूहरचना ठरविण्याची जबाबदारी पालकमंत्री शिंदेंवर.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर महानगरपालिकेवर कोणत्याही परिस्थितीत भाजपाचाच झेंडा फडकावयाचा, असा निर्धार करतानाच भाजपा स्वबळावरच ही निवडणूक लढविणार असल्याचा भाजपाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची खात्रीलायक माहिती राजकीय सूत्रांकडून हाती आली आहे. 


Loading...
नगरमधील भाजपातंर्गत खा. दिलीप गांधी व ॲड. अभय आगरकर यांच्या गटातटाला तिलांजली देत त्यांच्यात मनोमिलन प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत घडवून आणल्याचे वृत्त हाती आले आहे.  अहमदनगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यूहरचना आखणीसाठी भाजपाची मुंबईत मंगळवारी (दि. २१) बैठक पार पडली. 

या बैठकीला भाजपाचे खा. दिलीप गांधी व ॲड. अभय आगरकर यांच्यासह पदाधिकारी, मंडलाध्यक्ष, नगरसेवक यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, संघटनमंत्री किशोर काळकर, पालकमंत्री राम शिंदे, यांची उपस्थिती होती. 


या बैठकीसाठी खा. गांधी व ॲड. आगरकर गटांनी मोठे शक्तिप्रदर्शन केल्याची वंदता आहे. भाजपाने जळगाव, सांगली पालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळविल्याने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष बैठकीत अहमदनगर मनपा निवडणुकीत भाजपाने स्वबळाचाच नारा लावून धरला असून, कोणत्याही परिस्थितीत नगरच्या महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकाविण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. 


मात्र या बैठकीचा तपशील प्रसार माध्यमांकडे जाऊ नये, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही काहींनी खासगीत बोलताना सांगितले. नगरमध्ये भाजपातंर्गत खा. गांधी व ॲड. आगरकर गटांचे सख्य सर्वश्रुत आहे. त्या दृष्टीने पक्ष पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येऊन दोन्ही गटांत खा. दानवेंच्या पुढाकाराने मनोमिलन केल्याची वंदता आहे. 


एकमेकांच्या हातात हात घालून मनपावर भाजपाचा झेंडा फडकवा. नंतरच तुमच्या तक्रारींवर विचार केला जाईल, अशी सुचनाही दिली आहे. नगर महानगरपालिका निवडणुकीची व्यूहरचना ठरविण्याची जबाबदारी संघटनमंत्री किशोर काळकर व पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर सोपविण्यात आल्याचे समजते. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.