पिकअप-मोटारसायकल अपघातात एक ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  अकोले तालुक्यातील बाभुळवंडी - पिंपरकणे रस्त्यावर पिकअप जीप व मोटरसायकल यामध्ये झालेल्या अपघातामध्ये एकजण ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात नंदू पुंजीराम मंडलिक (वय ५५, रा. उंचखडक बुद्रुक, ता. अकोले) हे ठार झाले असून ते अगस्ति साखर कारखान्यातील कर्मचारी आहेत. 


Loading...
याबाबत पोलीस सूत्रांनी संगितले की, बाभुळवंडी -पिंपरकणे रस्त्यावर बाभुळवंडी शिवारात पिकअप जीपने (क्र. एमएच ४२ एम ८२३) समोरून येणा‍ऱ्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. यामध्ये नंदू पुंजीराम मंडलिक (वय ५५, रा. उंचखडक बुद्रुक, ता. अकोले) यांचे जागीच निधन झाले, तर दिलीप पांडुरंग जाधव (रा. आंबड, ता. अकोले) हे गंभीर जखमी झाले. जाधव यांना पुढील उपचारासाठी संगमनेरला हलविण्यात आले आहे. 

यावेळी पिकअप चालकानेच या दोघांनाही आपल्या गाडीत टाकून अकोल्याच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. त्यानंतर तो पिकअपसह अकोले पोलीस ठाण्यात दाखल झाला. पोलिसांनी चालक सोमनाथ घोरपडे (रा. लाडगाव, ता. अकोले) याचे विरूद्ध निष्काळजीपणे वेगाने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 


या अपघातातील हे दोघेही अगस्ति साखर कारखान्यातील कर्मचारी आहेत. मयत नंदू मंडलिक हे कारखान्याच्या टाइम ऑफिसमध्ये क्लार्क होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच अगस्ति साखर कारखान्याचे संचालक मिनानाथ पांडे, अशोकराव देशमुख, बाळासाहेब ताजणे, प्रताप देशमुख, संतु भरीतकर, राहुल देशमुख, आबासाहेब मंडलिक, भाऊ खरात आदींनी रुग्णालयात धाव घेतली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.