पीएच.डी. विद्यार्थी रातोरात बनला अब्जाधीश !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  ब्रिटनच्या ब्रिस्टल विद्यापीठात पीएच.डी. करत असलेला विद्यार्थी रातोरात अब्जाधीश बनला आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वी या विद्याथ्र्याने आपले प्राध्यापक आणि एका उद्योजकासोबत मिळून एक बायोटेक फर्म उभारली होती. ही फर्म आता आरोग्य क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेल्या डेन्मार्कच्या नोवो नोरडिस्क या कंपनीने खरेदी केली आहे. 


Loading...
बायोटेक फर्मची तब्बल ५५८८ कोटींत विक्री जवळपास ६२३ मिलियन पाऊंड अर्थात ५५८८ कोटी रुपयांमध्ये या कंपनीची विक्री करण्यात आल्याने विद्याथ्र्यासह प्राध्यापक आणि उद्योजकाचे नशीबच पलटले आहे.. पीएच.डी. करत असलेल्या ३१ वर्षीय हॅरी डेस्टेक्रोक्सने मधुमेहावरील प्रभावी इन्सुलीन बनविण्यासाठी 'झिओलो' नामक फर्म उभारली होती. 

प्राध्यापक अंथनी डेव्हिस, उद्योजक टॉम स्मार्ट आणि हॅरी या तिघांनी मिळून २०१४ मध्ये या फर्मची स्थापना केली होती. पाहता पाहता नावारूपाला आलेल्या या बायोटेक फर्मला आता डेन्मार्कमधील नोव्हो नोरडिस्कने अब्जावधी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. त्यामुळे कंपनीची स्थापना करणाऱ्या हॅरी, प्राध्यापक डेव्हिस आणि उद्योजक टॉम स्मार्ट यांची चांदी झाली आहे. 


कंपनीत २३ टक्के शेअर असलेल्या हॅरीच्या वाट्याला जवळपास १२८७ कोटींची रक्कम येणार आहे.झिओलोने विकसित केलेल्या ग्लुकोज-रिस्पोनसिव्ह इन्सुलिनमध्ये रक्तातील वाढणाऱ्या ग्लुकोज पातळीवर आपोआप नियंत्रण ठेवण्याची क्षमता आहे. त्यामुळे या इन्सुलिनच्या मदतीने मधुमेहावर आणखी प्रभावी उपचार केला जाणार आहे. 


उल्लेखनीय म्हणजे, झिओलो खरेदी करणाऱ्या नोव्हो नोरडिस्क या कंपनीनेच जगातील पहिले इन्सुलिन इंजेक्शन बनविले होते. सध्या जगभरात ३८ कोटींहून अधिक जण मधुमेहाने ग्रस्त आहेत. २०२५ सालापर्यंत भारतातील मधुमेही रुग्णांची संख्या १३ कोटींवर जाण्याचा अंदाज आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.