कार्यालयात उशीरा येण्याचे कारण; पत्नीची सेवा करतो !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- चित्रकूट उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात व्यवसाय कर कार्यालयातील उपायुक्ताकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने कार्यालयात उशीरा येण्याचे कारण विचारल्यानंतर आपली कर्मकहाणी लेखी स्वरुपात लिहून दिली. यावर अधिकारी अवाक् झाले. कर्मचाऱ्याने लिहिले होते, साहेब, पत्नीची प्रकृती ठीक नसते. तिचे शरीर दुखते. यामुळे मला हातपाय चेपून द्यावे लागतात. 

Loading...
तिला काम होत नाही. म्हणून दररोज घरी स्वयंपाक करावा लागतो. आता चपाती कशी बनवायची ते शिकत आहे. कधी-कधी चपाती करपते. यामुळे पत्नी माझ्यावरच चिडत असते. आजकाल घरी दलिया तयार करुन जेवतो आहे. तसेच माझ्या भागातील रस्त्यावर खूप मोठे खड्डे पडलेले आहेत. तर कधी रस्त्यात वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे कार्यालयात येण्यास उशीर होतो. 

पुढे त्याने दिलेल्या स्पष्टीकरणात अधिकाऱ्यांना विनंतीही केली की, यापुढे सकाळी पत्नीची सेवा करुन दररोज कार्यालयात वेळेवर येण्याचा प्रयत्न करतो. जास्त काय सांगू? तुम्हाला माझ्यावर आलेल्या अडचणीची चांगली जाणीव आहे. या कर्मचाऱ्याचे नाव अशोककुमार आहे. तो व्यवसाय कर कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत आहे. लिपिक अशोककुमार यास १८ ऑगस्ट रोजी कार्यालयात येण्यास उशीर झाला होता. 

त्याच्यावर कारवाई करण्यासाठी उपायुक्तांनी त्याच्यावर कारणे दाखवा नोटिस बजावली होती व लेखी खुलासा देण्यास सांगितले होते. या नोटिशीचे उत्तर देण्यासाठी त्याच दिवशी सायंकाळपर्यंतची मुदत दिली होती. चित्रकूट जिल्ह्यातील व्यवसाय कर कार्यालयातील लिपिकाने वरिष्ठ अधिकाऱ्यास दिलेल्या स्पष्टीकरणाची शहर व जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. 

कार्यालयातील कर्मचारी शासकीय कामात कशी टाळाटाळ करतात, सतत गैरहजर राहतात. विना परवानगी कार्यालयास दांडी मारतात. हे या प्रकरणानंतर दिसून येते. सर्व सामान्य नागरिकांना मात्र, कर्मचारी जागेवर नसल्याने चकरा मारण्याशिवाय पर्याय राहात नाही. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.