प्लास्टिक विक्री करणाऱ्यांकडून शिर्डीत एक लाखाचा दंड वसूल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी नगरपालिका आणि नाशिक प्रदूषण महामंडळ यांच्या पथकाने एकत्रित छापे टाकून प्लास्टिक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून १ लाख ११ हजार रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी दिली. . पर्यावरण मंत्री रामदास कदम शुक्रवारी (दि.१७) शिर्डीत काकड आरतीसाठी व साईसमाधीच्या दर्शनासाठी आले होते, त्यावेळी शिर्डी शहरात बंद असताना ही मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या पिशव्या विक्री होत असल्याचे त्यांना लक्षात आले होते. 


Loading...
त्यांनी तत्काळ याबाबत मुख्याधिकारी यांच्याकडे चौकशी केली व जे व्यापारी नियमांचा भंग करतात त्यांच्यावर तत्काळ कारवाई करा, असा आदेश दिला. तसेच प्रदूषण महामंडळाच्या नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही कारवाईबाबत सूचना केल्या. या सूचनेची दखल घेऊन तत्काळ शिर्डीत शहरात मंदिर परिसरासह विविध ठिकाणी व बाजारपेठेत छापे टाकण्यात आले, त्यातून या लोकांकडून दंडापोटी १ लाख ११ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता. 

कारवाई पूर्ण केल्यानंतर तसा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आला. ही कारवाई या पुढेही चालूच राहणार असल्याचे नगरपंचायतीने स्पष्ट केले आहे. मात्र, शिर्डी शहरात प्लास्टिक विक्री करण्यासाठी श्रीरामपूर व कोपरगाव परिसरातून अनेक व्यापारी शिर्डीत येतात. परंतू, कारवाई होत असल्याचा निरोप मिळताच विक्री करणाऱ्या या व्यापाऱ्यांनी शिर्डीला न येणे पसंत केले. अशा बाहेरून येणाऱ्या व प्लास्टिक विक्री करणाऱ्या लोकांवर ही कारवाई झाली पाहिजे, असा नागरिकांचा सूर आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------

Powered by Blogger.