श्रीगोंद्यात प्रशासन व पुढाऱ्यांच्या आशीर्वादानेच वाळूतस्करी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गटातटाचे राजकारण आहे. विकासाच्या मुद्द्यावर एकत्र न येणारे तालुक्यातील नेते मात्र वाळूतस्करीच्या व्यवसायात एकत्र आहेत. तालुक्याचे आजी,माजी आमदार,नेते व प्रशासनातील अधिकारी यांची मिलीभगत असून, त्यांच्या आशीर्वादामुळेच तालुक्यात अवैध वाळूउपसा जोरात सुरू आहे. आजी माजी आमदार तालुक्याला लुटण्याचे काम करत आहेत.

वाळूतस्करांची व अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्यामुळे तालुक्यात आलेला अधिकारी जाताना मालामाल होऊन जातात. असा घणाघाती आरोप शिवसेना जिल्हा समन्वयक घनश्याम शेलार यांनी केला. तालुक्यातील अवैध वाळूउपसा बंद करून वाळूतस्करांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर शिवसेनेच्यावतीने ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी शेलार बोलत होते.Loading...
 ते म्हणाले की, वाळूउपशासाठी असणारे सर्व नियम वाळूतस्करांकडून पायदळी तुडवले जात आहेत. तालुका हा पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक झाल्यामुळे हरित लवादाने वाळूचे लिलाव रद्द केले आहेत. तरीसुद्धा वाळूउपसा सुरूच आहे, त्यामुळे ज्या भागात वाळूउपसा होईल. 

तेथील तलाठी, ग्रामसेवक व पोलीस यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. तसेच वाळूतस्करी न थांबल्यास अधिकाऱ्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याचा इशाराही त्यांनी दिला. शिवसेना तालुकाअध्यक्ष संजय आनंदकर यांनी अधिकाऱ्यांना वाळूचोरीबाबत फोटोसह पुरावे देवूनही कारवाई होतं नाही. वाळूतस्करांना राजाश्रय भेटत असून, वाळूतस्कारांची व अधिकाऱ्यांची मिलीभगतमुळे वाळूतस्कर बिनधास्त आहेत. 


मात्र शिवसेना हा अवैध वाळूउपसा बंद करणार असल्याचे आनंदकर यांनी सांगितले. महसूल विभाग वाळूतस्करांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप या वक्त्यांनी केला. तसेच नगर दौंड रस्त्यात तालुक्यातील सर्वच नेत्यांची भागीदारी असून, हेच नेते वाळूतस्करांना पाठीशी घालत असल्याची टीकाही केली. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.