नगर- जामखेड रोडवरील खड्डयांचे राष्ट्रवादीकडून श्राद्ध.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर -जामखेड रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने याचा वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या खड्डयांकडे बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी नगर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी मार्गाने खड्डयांचे श्राद्ध घालण्यात आले.

नगर -जामखेड रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामध्ये काही खड्डे तर एक फूट खोल आहेत तसेच चिंचोडी पाटील परिसरात असलेल्या गतिरोधकावर पांढरे पट्टेच राहिले नसल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. हे खड्डे बुज़वण्यासाठी व बांधकाम विभागाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी नगर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने श्राद्ध घालण्यात आल.Loading...
या वेळी नगर ता. राष्ट्रवादीचे सरचिटणीस रामेश्वर काळे, युवक उपाध्यक्ष शामराव कांबळे, अल्पसंख्याक सेलचे उपाध्यक्ष रिजवान शेख, श्रीकांत काळे, बंडू खराडे, गणेश कांबळे, नितीन खडके, भरत कोकाटे, जयसिंग दळवी, अनिकेत जगताप, दीपक मेटे, अक्षय परकाळे, सचिन खडके, संभाजी डोखडे, संतोष कैदके, रवी दहातोंडे, दादा साठे, सुरेंद्र दहातोंडे, वैभव कोकाटे, गंगा सातपुते, महेश गवारे, विशाल हजारे, जयेश महाडिक, लाला हजारे, महादेव तनपुरे आदी उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.