शेतकरी धार्जिणे सरकार आणण्याकरिता युवकांनी परिवर्तनासाठी सज्ज रहावे : घुले


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आरक्षणाच्या मागणीसाठी विविध समाजघटक रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, राज्यातील भाजप सरकारला आरक्षणच द्यायचे नाही, आरक्षणामुळे बहुजन समाजातील मुले नोकरीला लागली तर आमची मुले काय. करतील, याची भीती मनुवाद्यांना वाटत आहे म्हणून आरक्षणाचा विषय लांबणीवर टाकला जात आहे, असा आरोप करून विविध समाजघटकांना बरोबर घेऊन शेतकरीधार्जिणे सरकार आणण्याकरिता युवकांनी परिवर्तनासाठी सज्ज रहावे, असे आवाहन माजी आमदार नरेंद्र पाटील घुले यांनी केले. 


Loading...
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील युवकांसाठी शेवगाव येथे आयोजित बूथ कमिटी संकल्प मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून घुले बोलत होते.. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मा. आ. चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, उपाध्यक्ष स्वप्नील घुले, जिल्हाध्यक्ष कपिल पवार, पं. स. सभापती क्षितीज घुले, अरुण पाटील लांडे, संजय फडके, पंडित भोसले, बबन भुसारी, अंबादास कळमकर, कैलास नेमाने यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

मा. आ. नरेंद्र पाटील घुले म्हणाले, या मतदारसंघात रखडलेल्या ताज़नापूर लिफ्टसह विविध प्रकल्पांना निधी नाही. निधीबाबत लोकप्रतिनिधी ब्र शब्दही बोलत नाहीत.यांचे हात कुणी धरले आहेत. मतदारसंघात हप्तेखोरीचे राज्य आले असून, पोलीस अधिकाऱ्याचीच वर्दी चोरीला जात आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी नाही, पीकविमा नाही, जे देतात, त्यासाठी विविध जाचक अटी घालून यामध्ये शेतकऱ्याना अडकविण्याचे काम सरकार करीत आहे. एक पंचवार्षिक निवडणूक म्हणजे एका पिढीचा उत्कर्ष किंवा इतिहास होत असतो म्हणून या वेळी आम्हाला संधी द्या, युवकांमध्ये असीमित ताकद असते, ती यावेळच्या निवडणुकीत दाखवून द्या.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.