डॉ. शिंदेंचा ‘आत्मनिर्धार फाऊंडेशन’च्या वतीने ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मान!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- माणूस आजारी पडल्यावर तो डॉक्टरला त्याच्या दुखणे सांगू शकतो. मात्र पशुधनांवर उपचार करताना पशुवैद्यकांना ते स्वतःच जाणून घेऊन उपचार करावे लागतात. त्यामुळे शेतकरी बांधवासाठी त्यांचे योगदान लाखमोलाचे आहे, असे गौरवोद्गार जि.प.सदस्य अनिल कराळे यांनी काढले.

ते सहा.पशुधन विकास अधिकारी डॉ.बी.एम.शिंदे यांचा सेवानिवृत्ती व पुरस्कार प्रदान सोहळा तसेच प्रगतिशील शेतकरी व शेतकरी संघटनेचे युवा नेते संदिप गेरंगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते.निंबळक (ता.नगर) येथील कोटीलिंग तीर्थ देवस्थान च्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
Loading...

कराळे पुढे बोलताना म्हणाले, शेतकरी स्वावलंबी व समृद्ध होणे खूप गरजेचे असून त्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती साधता यायला हवी. डॉ. बाळासाहेब शिंदे यांच्या सारख्या अधिकाऱ्यांनी त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून तळागाळातील शेतकऱ्यांना आधार दिला. 

संदिप गेरंगे यांच्या सारखे उच्चशिक्षित युवकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले दुग्धोत्पादन वाढवून प्रगती साधली. अशी अनेक उदाहरणे आहेत. आम्हीही जिल्हा परिषदेत शेतकऱ्यांचा प्रत्येक प्रश्न, योजनांसाठी भरीव निधी मिळावा यासाठी प्रयत्नशील असतो.

यावेळी अध्यक्ष पदावरुन बोलताना ह. भ. प. डॉ. जालिंदर निकम महाराज म्हणाले, मनुष्य हा कधीच निवृत्त होत नसतो. त्याप्रमाणेच डॉक्टर हे जरी शासकीय सेवेतून निवृत्त झाले असले तरी त्यांनी शेतकऱ्यांसाठी आपली सेवा चालूच ठेवावी. कुटुंबाबरोबरच सामाजिक कार्यात ही सक्रिय राहावे.

यावेळी ह.भ. प. सिद्धीनाथ मेटे महाराज, ह.भ.प.अंबादास खंडागळे महाराज, डॉ. दिलीप पवार, मा.सरपंच विलासराव लामखडे, संजय गेरंगे, पोपट खामकर, बालाजी जाधव, किरण पडोळे, सागर कराळे, संतोष कासार, नाना दिवटे, आदी उपस्थित होते. आत्मनिर्धार फाऊंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी यांनी प्रास्तविक, उद्धव काळापहाड यांनी सूत्रसंचालन, तर आभार संतोष शिंदे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.मच्छिंद्रनाथ म्हस्के, महादेव गवळी, अमोल शिंदे, राहुल ठाणगे, ह.भ.प.संतोष वाघ महाराज, विनोद सूर्यवंशी, पंकज नाईकवाडी, संतोष शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

‘डॉक्टर नात्यापलीकडचे’  

 यावेळी डॉ. बाळासाहेब शिंदे यांच्या जीवन कारकिर्दीवर आधारित ‘डॉक्टर नात्यापलीकडचे’ हा विनोद सूर्यवंशी दिग्दर्शित माहितीपट दाखवण्यात आला. सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमातील हा आगळा वेगळा प्रयोग अनेकांना भावला. याचवेळी आत्मनिर्धार फाऊंडेशन डॉ. शिंदे यांचा पत्नी कमल समवेत जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच सत्कारामध्ये वृक्ष, गुलाबपुष्प व पुस्तिका देऊन सत्कार करण्यात आल्याने या भूमिकेचेही मान्यवरांनी कौतुक केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.