विचारवंतांवर हल्ले करणाऱ्या मुख्य सुत्रधारांवर कारवाई करा - आ.बाळासाहेब थोरात.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :देशातील विचारवंतांवर हल्ले होत असून झुंडशाही थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने शासनाला आदेश दिले आहे. डॉ.दाभोळकर, कॉ.पानसरे यांसारख्या समाजासाठी निस्वार्थीपणाने काम करणाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या मुख्य सुत्रधारांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.


Loading...
डॉ.नरेंद्र दाभोळकर, कॉ.गोविंद पानसरे यांच्या खुनातील दिरंगाईबाबत केंद्र व राज्य सरकारच्या असंवैधानिक वर्तनाबाबत 'जवाब दो' आंदोलनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, रंजना गवांदे, प्रा.बाबा खरात, हिरालाल पगडाल, अशोक गवांदे, अब्दुला चौधरी, संग्राम जोंधळे, अरविंद गाडेकर, समीर लामखडे, ज्योती मालपाणी, अनुराधा आहेर आदी उपस्थित होते. 

यावेळी महात्मा फुले पुतळा ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत 'जवाब दो' रॅली काढण्यात आली.. आ.थोरात म्हणाले, स्वामी अग्निवेशसारख्या ज्येष्ठ व्यक्तींवर दिल्ली व हरियाणा या ठिकाणी हल्ले होतात याची 
दखल घेतली नाही. देशात व राज्यात विचारवंतांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून यामुळे विचार संपणार नाही. 

अंनिसचे काम करणारे डॉ.नरेंद्र दाभोळकर व कॉ.गोविंद पानसरे यांची हत्या करण्यात आली असून यातील मुख्य सुत्रधारांवर अद्यापही कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. सर्वोच्च न्यायायालयाने देखील विचारवंतांवर हल्ले करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे शासनाला आदेश दिले आहे. झुंडशाही थांबविणे ही शासनाची जबाबदारी असून हल्लेखोरांवर वेळीच कारवाई होणे गरजेचे असल्याचे ही ते यावेळी म्हणाले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.