कल्याण राष्ट्रीय महामार्गावर माजी सरपंचांचे अपघाती निधन.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर - कल्याण राष्ट्रीय महामार्गावर टाकळी खातगाव जवळ पिकअप व मोटारसायकलच्या अपघातात वडगाव आमली येथील प्रगतशील शेतकरी व माजी सरपंच सूर्यभान डेरे यांचा जागीच मृत्यू झाला. 

Loading...
याबाबत माहिती अशी की, वडगाव आमली येथील सूर्यभान डेरे यांचा दूध व्यवसाय असून, ते नगर येथे घरगुती ग्राहकांना दूध पुरवठा करतात. नेहमीप्रमाणे ते दूध पुरवठा झाल्यानंतर गावाकडे परतत असताना दुपारी दोन सव्वादोनच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या माल वाहतूक पिकअप एम.एच.१४ ए.झेड ७७८४ गाडीला डेरे यांच्या मोटारसायकल एम.एच. १६ बी.जी ४८१३ ची मागून धडक झाली.

यात डेरे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. डेरे यांनी आदर्श गाव वडगाव आमलीचे दहा वर्षे सरपंच पद भूषविले होते. अत्यंत मीतभाषी, असा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या अचानक निधनाने गाव तसेच परिसरात शोककळा पसरली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.