शरद पवार यांचा 24 ऑगस्टचा नगर जिल्हा दौरा रद्द


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- माजी केंद्गीय कृषीमंत्री शरद पवार यांचा 24 ऑगस्टचा नगर जिल्हा दौरा रद्द झाला आहे. काही कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आला असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुत्रांनी सांगितले. शरद पवार यांच्या जिल्हा दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. 
Loading...

पवारांच्या दौऱ्यात आगामी लोकसभा निवडणुकीची रणनितीही ठरविली जाणार असल्याचे बोलले जात होते. याच दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची निवडही जाहिर करण्यात येणार होती. तथापी रा. कॉ. च्या जिल्हाध्यक्षांची निवड मुंबईत प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत जाहिर झाली असून पवारांचा दौराही काही कारणास्तव रद्द झाला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.