कोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या सहा तासात सुनावली शिक्षा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बलात्काराच्या घटनेत नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे मध्यप्रदेशमध्ये उज्जैनमध्ये सहा दिवसांपूर्वी झालेल्या बलात्काराच्या प्रकरणा 14 वर्षांच्या अल्पवयीन आरोपीला अवघ्या सहा तासात न्यायाधिशांनी शिक्षा सुनावली आहे. देशातला हा बलात्काराचा पहिला असा खटला आहे ज्यात न्यायालयाने अवघ्या सहा तासात निर्णय दिलाय.
Loading...

उज्जैनजवळील घट्टिया इथं 6 दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलाने चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला होता. त्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन आरोपीला राजस्थान येथून अटक केली. आज या आरोपीला अल्पवयीन न्यायालयात आणण्यात आलं.

सोमवारी सकाळी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आणि जवळपास सहा तासात न्यायाधिशांनी आपला निर्णय दिला. देशातला हा बलात्काराचा पहिला असा खटला आहे ज्यात न्यायालयाने अवघ्या सहा तासात निर्णय दिलाय. बलात्कार करणाऱ्या 14 वर्षांचा अल्पवयीन आरोपीला दोन वर्षांची शिक्षा सुनावली असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

ही घटना सहा दिवसांपूर्वी घडली होती. उज्जैन जिल्ह्यातील घड्डिया इथं जलवा गावात राहणाऱ्या एका चार वर्षांच्या मुलीवर 15 अॉगस्ट रोजी आरोपीने घरात बोलवून बलात्कार केला होता. या प्रकरणी घड्डिया पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात कलम 376 नुसार पाक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपीने राजस्थानला पळ काढला. तिथे तो आपल्या नातेवाईकाकडे लपून बसला होता. दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या टीमने त्याला ताब्यात घेतलं.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.