पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा शिवारात पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार झाल्याची घटना शनिवार दि. १८ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली. अशिम दास (वय-४२, रा. पश्चिम बंगाल) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Loading...
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आंबीखालसा शिवारात पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अशिम दास यांच्या अंगावरुन गाडी गेल्याने ते जागीच ठार झाले. चेहऱ्याचाही चेंदामेंदा झाला होता. घटनेची माहिती पोलिसांना समजताच घारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अंबादास भुसारे, पोलिस नाईक संतोष खैरे, किशोर लाड आदि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

त्यानंतर पोलिसांनी महामार्गावर गाडीचा शोध ही घेतला पण गाडी सापडली नाही. . याप्रकरणी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या खबरीवरुन घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल संजय विखे हे करत आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.