ग्रामविकास अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड तालुक्यातील जवळा येथील ग्रामविकास अधिकारी रामचंद्र शिंदे यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्या. अन्यथा काम बंद आंदोलनाचा इशारा जामखेड तालुक्यातील ग्रामसेवकांनी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना व पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार व गटविकास अधिकारी आशोक शेळके यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Loading...

जामखेड तालुक्यातील जवळा ग्रामपंचायत मध्ये रामचंद्र अभिमन्यू शिंदे हे ग्रामविकास अधिकारी म्हणून काम करत आहेत. जवळा गावातीलच एका महिलेने शासनाच्या रमाई आवास योजनेंतर्गत घरकूलासाठी अर्ज केला होता. परंतु शासन निकषानूसार ते घरकूलाचा लाभ घेण्यास अपात्र ठरले.निकषात बसत नसल्याने घरकूल देता येणार नाही असे ग्रामसेवक रामचंद्र शिंदे यांनी सांगितले.

याचा राग मनात धरून घरकुलासाठी अपात्र ठरलेल्या संबंधितांनी ग्रामविकास अधिकाऱ्या विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला दि.१८ ऑगस्ट रोजी ॲस्ट्रासिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हा दाखल करून ग्रामविकास अधिकारी रामचंद्र शिंदे यांच्यावर अन्याय झाला आहे.हा अन्याय दूर करण्यासाठी दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. अन्यथा दि.२१ ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.