जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये मी नाही,नगर जिल्ह्यात पक्षाचे संगटन मजबूत करणार : ॲड. ढाकणे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मला पदाचा मोह नव्हता व नाही. जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये मी नाही. तशी इच्छा मी कधीही कोणाकडेही प्रदर्शित केलेली नाही. पक्ष संघटनेचे काम करीत राहणार आहे, असे स्पष्टीकरण केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रतापराव ढाकणे यांनी दिले आहे. 

Loading...
याबाबत ॲड. प्रताप ढाकणे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात मी जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. पत्रकात ढाकणे यांनी म्हटले आहे की, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक नाही. मला व्यक्तीश: कुठल्याही पदाचा मोह नाही. शरद पवार यांचा व पक्षाच्या पुरोगामी विचारसरणीचा पाईक म्हणून कोणत्याही पदाशिवाय नगर जिल्ह्यात पक्षाचे संगटन मजबूत करणार आहे. 

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष निवडीसाठीची चर्चा वर्तमानपत्रांत सुरू आहे. त्यामध्ये मी इच्छुक असल्याचे वाचले आहे. मात्र, मी कधीही पक्ष अथवा पक्षातील कोणाकडे जिल्हाध्यक्ष पदाची इच्छा प्रगट केलेली नाही. यापुढील काळातही पदाच्या अपेक्षेशिवाय जिल्ह्यात पक्षकार्य करीत राहू. 

शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे संघटना बांधणीचे काम करणार आहे. माझ्या नावाची चर्चा जिल्हाध्यक्ष पदासाठी सुरू असल्याची कोणतीही गोष्ट नाहीच. मला पद नको आहे. पक्षाचा पाईक म्हणून काम करीत राहणार आहे. सामान्य माणसांसाठी संघर्ष करण्याचा वारसा मला आहे व तो मी जपतो आहे, असे ढाकणे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.