गाडीचे ऑईल गळत असल्याचे सांगून ८० हजारांची रोकड लंपास.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नवनाथ नाना तांबवे यांना गाडीचे ऑईल गळत असल्याचे सांगून त्यांच्या गाडीच्या डिक्कीतील ८० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. याबाबत तांबवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की नवनाथ तांबवे यांनी सोमवार दि.२०रोजी दुपारी एक वाजता बँकेतून ८० हजारांची रक्कम काढून ती त्यांनी टाटा इंडिका या कारच्या किल्नरच्या बाजूकडील डिकीत ही रक्कम,दोन चेकबुक,व एटीएम ठेवले. त्या ठिकाणावरून तांबवे हे काही फूट अंतरावर गेले असता, एका अनोळखी इसमाने तांबवे यांना आवाज देत तुमच्या गाडीच्या बोनेट मधून ऑईल गळत असल्याचे सांगितले. 

त्यामुळे तांबवे यांनी खाली उतरून पाहणी केली तेव्हा त्यांना ऑईल गळत नसल्याचे दिसले. ते पुन्हा गाडीत येउन बसले तेव्हा त्यांना त्यांच्या डिक्कीतील ८० हजारांची रक्कम,दोन चेकबुक व एटीएम गायब झाल्याचे दिसले. त्यावर त्यांनी संबंधित व्यक्तीचा आजूबाजूला शोध घेतला असता तो मिळून आला नाही. त्यामुळे त्यांनी याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.