क्रिकेट खेळातून तरुणाची हत्या,आठजणांविरूद्ध गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्यातील वळण येथील मंगेश अण्णासाहेब खिलारी (वय २२) या महाविद्यालयीन तरूणाचा क्रिकेट खेळण्याच्या कारणांवरुन आठजणांनी धारदार शस्त्राने १५ ते २० वार करुन खून केला. १९ ऑगस्ट रोजी रात्री ही घटना घडली. तालुक्यात दोन दिवसांत दोन खून झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सतिष रघुनाथ खिलारी यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगेश खिलारी याचे किरण पोपट कुलट, दादासाहेब शंकर कुलट, प्रशांत नारायण शिवरे, सचिन नंदू जाधव, किरण उत्तम बर्डे, किरण बाळासाहेब खुळे, लखन बाळासाहेब खुळे व अमोल भाऊसाहेब कुलट (सर्व रा. वळण) या आठ तरूणांबरोबर १५ दिवसांपूर्वी क्रिकेट खेळण्याच्या कारणावरुन वाद झाला होता. 

त्याचा राग मनात धरून वरील आठ आरोपींनी संगनमत करून टणक वस्तू व धारदार शस्त्राने मयत मंगेश खिलारी याच्या डोक्यावर, गळ्यावर तसेच पोटावर सुमारे १५ ते २० वार करुन त्याला ठार मारुन त्याचा मृतदेह वळण गावच्या शिवारात असलेल्या दूध चिलिंग प्लॅन्टच्या बंद पडलेल्या बांधकाम इमारतीमध्ये लपवून ठेवला होता.मंगेश खिलारी हा दि. १८ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजल्यापासून बेपत्ता होता. त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत असतांना त्यांना दि. १९ ऑगस्ट रोजी रात्री मंगेश याचे प्रेत आढळून आले. 


यावेळी श्रीरामपूर येथील पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, राहुरीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले, सतिष शिरसाठ, हवालदार अनिल पवार, नवनाथ वाघमोडे, गुलाब मोरे व मेटकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेतली. पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून रात्रभरात आठ पैकी सहा आरोपींच्या मुसक्या आवळून गजाआड केले आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.