२०१९ च्या निवडणुकीत भाजपला बसणार मोठा झटका


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत एक भविष्यवाणी केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला दिल्लीत मोठा झटका बसणार आहे, असा दावा आम आदमी पार्टीच्या संयोजकानी केलेला आहे. 

दिल्लीतील सरकार करत असलेल्या अनेक लोकविकासाच्या कामामध्ये हस्तक्षेप केल्याने दिल्लीची जनता भाजपावर नाराज आहे. यामुळे भाजपाला दिल्लीत मोठा झटका सहन करावा लागणार असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलेले आहे.


दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जनता भाजपा खासदारांवर नाराज आहे आणि आम आदमी पक्षाच्या दिल्ली सरकारवर खूपच खूश आहे. दिल्ली सरकारच्या अनेक कामांत भारतीय जनता पक्षाने अडचणी निर्माण के ल्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला मोठा झटका बसणार आहे. . 

अशाप्रकारे केजरीवाल यांनी यापूर्वी अनेकदा मोदी सरकारवर हल्ले चढवलेले आहेत. जे लोक धर्माच्या नावावर देशाची वाटणी करतात, ते देशासाठी हितचिंतक नाहीत. देशाच्या विकासासाठी लोकांनी एकमेकात प्रेम आणि सन्मानाची भावना ठेवण्याचे अपील केजरीवाल यांनी यापूर्वी केले आहे. दिल्ली मुख्यमंत्री निवासस्थानी मारहाण झाल्याबद्दल सरकारचे मुख्य सचिव अंशु प्रकाश यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केले आहे. 


यानंतर केंद्र सरकार, त्यांच्या विविध संस्था, उपराज्यपाल आणि काही अधिकाऱ्यांनी घेतलेल्या आडमुठ्या धोरणांमुळे जनतेच्या हिताची कामे करत असलेल्या दिल्ली सरकारला आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून केंद्रातील सरकार घाबरविण्यास यशस्वी होणार नसल्याचे आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी म्हटलेले होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.