कल्याण- विशाखापट्टणम् राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटामध्ये ट्रक दरीत कोसळला


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कल्याण- विशाखापट्टणम् राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटामध्ये रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ब्रेक नादुरुस्त झाल्याने एक ट्रक कठडा तोडून माणिकशहा दग्र्याजवळील खोल दरीत कोसळा. अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. 
Loading...

अपघाताबाबतची माहिती अशी- रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एमएच २६ एम ६६ ७८ हा ट्रक पुण्याहून पशुखाद्य घेऊन परभणीकडे जात होता. करंजी घाट उतरत असताना माणिकशाहॉ दग्र्याजवळील धोकादायक कळणाजवळ या ट्रकचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने ट्रक घाटातील कठडा तोडून पन्नास फूट खोल दरीत कोसळला. 


अपघातामध्ये ट्रकचालक बाळू केकाळे, रा. खळी, ता. गंगाखेड व क्लिनर छत्रपती आव्हाड रा. आंबेटाकळी, जि. परभणी हे दोघे सुदैवाने बचावले. मात्र, ट्रक व ट्रकमधील पशुखाद्याचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती समजताच करंजी पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी राख, खोमणे, पालवे यांच्यासह गावातील चंद्रशेखर मोरे, विकास अकोलकर, नवनाथ आरोळे यांनी घटनास्थळी ज़ाऊन अघातग्रस्तांना मदत केली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.