जनतेचे प्रश्न कायम ठेऊन आम्ही राजकारण करत नाही - सुजय विखे पाटील.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी मतदारसंघात घरकूल योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करून लाभाथ्‍र्यांना घरांची उपलब्‍धता करून देणार असल्‍याची माहिती पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. ज्‍यांना जागा उपलब्‍ध होणार नाही, अशा लाभार्थ्यांना जागेची उपलब्‍धता करून देऊन पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या नावाने घरकूल योजना सुरू करण्‍याचा मानसही त्‍यांनी व्‍यक्‍त केला. 

Loading...
डॉ. विखे म्हणाले, मतदारसंघात नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न सोडविले जातात. जनसामन्यांनी टाकलेल्या जबाबदा‍ऱ्या पार पाडल्या जातात. सर्वांना रेशन व गरजूंना स्वस्त धान्य व बेघरांना घरकुलासाठी आपण कटिबद्ध राहाणार आहोत. आपण खोटी आश्वासने देत नाही, विकासकामे करताना राजकारण करत नाही. मतदारसंघ हा आपला परिवार आहे. गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्याचे संस्कार आपल्याला मिळाले आहेत. शासन आपल्या दारी योजनेतून सर्वांना शासकीय योजनांचा लाभ देत असतानाच ही योजना राबविताना कुणी केवळ कागदपत्रांसाठी जनतेला वेठीस धरू नये. 

मतदारसंघात आजपर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून जनतेला आधार देण्याचे काम केले जात असले, तरी गोरगरीब वंचितांना लाभ मिळण्यासाठी यामध्ये पारदर्शकपणा आला पाहिजे.. जनसेवा हाच आपला उद्देश आहे. जनतेने आम्हाला खूप प्रेम, जिव्हाळा दिला आहे. त्यातूनच या सर्व गोष्टी करत आहोत. योजना सुरु झाल्यावर काही जण म्हणतात निवडणुकीसाठी हे सुरु आहे, पण जनतेचे प्रश्न कायम ठेऊन आम्ही राजकारण करत नाही. खोटी आश्वासने आपल्या देता येत नाही. 

जनसेवेच्या कार्यकर्त्यांनी राजकारण करावे; पण राजकारणाकरता आपल्या गोरगरीब जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळून देण्यासाठी प्रयत्न करावा. समाजकारणातून पद आणि प्रतिष्ठा मिळून देण्याचा डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांना अभिप्रेत असलेल्या विकास करावा, असे सांगतानाच देशात या योजनेचे नवे मॉडेल तयार व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.प्रारंभी नायब तहसीलदार राहुल कोताडे यांनी रेशनकार्ड, दुबार रेशनकार्ड, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेची माहिती दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.