श्रीगोंदा तालुक्यातील एकाची आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील म्हातारपिंप्री येथे सोमवार दि.२० रोजी वसीम गफूर खान यांच्या शेतातील लिंबोणीच्या झाडाला एका ३०-३५वर्षे वयाच्या अज्ञात पुरुषाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.सदर व्यक्तीचा घातपात झाला असण्याची शक्यता व्यक्त होत असून, खान यांनी दिलेल्या खबरीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर घटनास्थळी श्रीगोंदा पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार व सहायक पोलिस निरीक्षक नीलेश कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.. याबाबत माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील म्हातारपिंप्री येथील रहिवासी वसीम गफूर खान हे सोमवार दि.२०रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास लिंब काढण्यासाठी पत्नीसह शेतात गेले लिंबे काढत असताना, त्यांना त्यांच्या बागेतील एका लिंबोणीच्या झाडाला एका तीस ते पस्तीस वर्षे वयाच्या पुरुषाचे प्रेत लटकलेले दिसले. त्यानंतर खान यांनी याबाबत गावच्या पोलीस पाटलांना माहिती दिली. 


Loading...
सदर घटनेबाबत गावात व परिसरात वाऱ्यासारखी माहिती पसरल्यामुळे घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. सदर मृतदेहाची ओळख पटलेली नसून, या इसमाचा घातपात करून मग त्याला लटकवण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकाराबाबत वसीम खान यांनी दिलेल्या खबरीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून. पुढील तपास पोलीस करत आहेत.
----------------------------

Loading...
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.