उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याप्रकरणी लिपिकासह पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याप्रकरणी शिर्डी नगर पंचायतीतील मुख्य लिपिक व त्याच्या पत्नीच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येथील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. रेखा व मुरलीधर बाजीराव देसले यांनी उत्पन्नाच्या ९२ टक्के अधिक संपत्ती जमवल्याचे समोर आले. 

देसले याने १९९४ ते २०१० या कालावधीत १७ लाख ३० हजार ६१८ रुपयांची जास्तीची संपत्ती जमवली. पत्नी रेखाने त्याला सहकार्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोघांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ चे कलम १३ (१) (ई) सह १२ (२) व भादंवि कलम १०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर येथील पोलिस उपअधीक्षक किशोर चौधरी, निरीक्षक श्याम पवरे, दीपक करांडे, हेड कॉन्स्टेबल तन्वीर शेख, पोलिस नाईक प्रशांत जाधव, विजय गंगुल, अशोक रक्ताटे, राधा खेमनर यांनी केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.