सासरच्या छळास कंटाळून विहिरीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे वैशाली गाडे या विवाहित तरुणीने सासरच्या सतत होणाऱ्या छळास कंटाळून विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना दि. ३१ जुलैच्या रात्री घडली असून माहेरकडील लोकांनी राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडला होता. 

त्यानुसार राहुरी पोलीस ठाण्यात सासरच्या तीन लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. तालुक्यातील निंभेरे येथील बाबासाहेब चंद्रभान सिनारे यांची कन्या वैशाली हिचा विवाह बारागाव नांदूर येथील प्रकाश बाबासाहेब गाडे या तरुणाशी झाला होता. 


लग्नाच्या काही वर्षांनंतर सासरकडच्या लोकांनी घर बांधण्यासाठी वैशाली हिने माहेरून पाच लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी तिचा शारिरीक व मानसिक छळ केला. सासरच्या सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून वैशाली प्रकाश गाडे (वय २२) या विवाहित तरुणीने दि. ३१ जुलै रोजी रात्री ९.३० वाजेदरम्यान बारागाव नांदूर येथील बोरटेक शिवारात विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेनंतर मयत वैशाली हिच्या माहेरच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाणे गाठून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.या घटनेबाबत बाबासाहेब चंद्रभान सिनारे यांच्या फिर्यादीवरुन राहुरी पोलिसात मयत वैशालीचा पती प्रकाश बाबासाहेब गाडे, सासरा बाबासाहेब दादा गाडे व सासू मंगल बाबासाहेब गाडे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.