महिलेच्या खुनाचे श्रीगोंदा पोलिसांसमोर आव्हान.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील औटेवाडी येथील तलावात एका ३५ वर्षीय महिलेचा क्रूर पद्धतीने खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह फेकून देण्यात आला होता. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. दरम्यान या खून प्रकरणाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान श्रीगोंदा पोलिसांसमोर आहे.

Loading...
दि.३१ रोजी सायंकाळी चारच्या सुमारास औटेवाडी तलावात ३५ वर्षीय महिलेचा विवस्त्रस्थेत असणारा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पाण्यात आणून टाकला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. 

या महिलेच्या डोक्यात, चेहऱ्यावर धारदार शस्त्राने मारहाण केल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत. तसेच हातावरही दोन ठिकाणी जखमा झाल्याचे सांगण्यात आले. या मृतदेहाच्या गळ्याभोवतीही काही व्रण आढळून आले आहेत. महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुणे येथे पाठवला असून, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर अधिक माहिती समोर येणार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.