श्रीरामपुरात पोलिसांसमोर सराफाने घेतले विष !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आरोपीला घेऊन चौकशीसाठी आलेल्या पोलिसांसमोर येथील एका त्रस्त सराफाने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या निषेधार्थ सराफ दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली व मोर्चाने जात पोलिसांना निवेदन दिले. सराफावर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


Loading...
गोरख दिगंबर मुंडलिक (वय ४७) असे या सराफाचे नाव आहे. काल संगमनेर पोलिसांचे पथक एका आरोपीला घेऊन एका गुन्ह्याच्या चौकशीसाठी शहरात आले होते. आरोपीने दाखविलेल्या दुकानात पोलीस गेले. मुंडलिक यांचे ते दुकान होते. तेथे पोलिसांनी मुंडलिक यांच्याकडे चोरीचे सोने घेतल्याबाबत विचारणा केली. 

मुंडलिक यांनी त्याचा इन्कार केला. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना चौकशीसाठी पोलीस गाडीत बसण्यास सांगितले. यावरून मुंडलिक व पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. संतापलेल्या मुंडलिक यांनी हा नेहमीचाच त्रास असल्याचा आरोप केला व पोलिसांसमोरच विष पिऊन घेतले. 


पोलिसांनी त्यांच्या हातातील बाटली हिसकावून घेतली, मात्र अस्वस्थ वाटल्याने त्यांना शहरातील साखर कामगार रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली.शहरातील सर्व सराफांनी यावेळी आपली दुकाने बंद ठेवून पोलिसांच्या नेहमीच्याच त्रासाबद्दल निषेध नोंदविला.सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांचीही सराफ व्यावसायिकांनी भेट घेऊन निवेदन दिले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.