बंद घर फोडून सव्वादोन लाखांचा ऐवज लांबवला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर शहरातील प्रभाग तीनमधील व्यापाऱ्याचे बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज लांबवला. अशोक नरसय्या इराबत्तीन (दत्त मंदिराजवळ) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. इराबत्तीन कुटुंब कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. 
Loading...

त्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याची नथ, अंगठ्या, चांदीच्या वाट्या, दिवा, पितळी डबे, पातेले, घमेले, तसेच १ लाख ६२ हजार ५०० रोख रक्कम असा सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरून नेला. गावाहून परत आल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.