स्मार्टफोन हिरावतोय आपले आनंदाचे क्षण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- डिजिटल उपकरणे खासकरून स्मार्टफोनवर जास्त वेळ घालविल्यामुळे आपण लोकांपासून दूर जात आहोत. बऱ्याच एखाद्या ठिकाणी उपस्थित असूनही आपण तिथे असून नसल्यासारखे असतो. कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाच्या शास्त्रज्ञांनी एका ताज्या अध्ययनातून हा निष्कर्ष काढला आहे. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, जेवताना थोडावेळ जरी फोनचा वापर केल्यास व्यक्ती आपल्या जवळच्या लोकांसोबत आनंद घेऊ शकत नाही. या अध्ययनाचे प्रमुख रायन डॉयर यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या अध्ययनातून लोकांचे एकमेकांसोबत भेटणे आणि बातचित करणे आपल्यासाठी लाभदायक असल्याचे सिद्ध झाले आहे. 


Loading...
नवनवीन तंत्रज्ञान खरेतर अतिशय शानदार आहे, मात्र ती मित्र व कुटुंसोबत घालविलेले आपले क्षण हिरावून घेतात. ही बाब सिद्ध करण्यासाठी शास्त्रज्ञांनी दोन अध्ययने केली. रेस्टॉरंटमध्ये केलेल्या अध्ययनादरम्यान सुमारे ३०० प्रौढांपैकी काहींना आपला फोन वायब्रेशन वा नॉर्मल मोडवर ठेवण्यास सांगितले . जेवण झाल्यानंतर या सगळ्या लोकांंना काही प्रश्न विचारले. जे लोक फोनपासून दूर होते, त्यांचा आपले कुटुंब व मित्रांसोबत मिसळण्याचा अनुभव इतरांपेक्षा चांगला होता. 

शास्त्रज्ञांनी १२० लोकांवर एक सर्वेही केला. एक आठवडाभर दररोज सगळ्यांना पाच वेळा सर्वेत सहभागी केले. त्यात त्यांना कसे वाटत आहे व सर्वे पूर्ण करण्याआधी १५ मिनिटे ते काय करत होते, हे दोन मुख्य प्रश्न विचारण्यात आले, फोनचा वपर करणाऱ्यांना समोरासमोर बसून बातचित करण्यात जास्त अडचण येत असल्याचे दिसून आले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.