शहर पोलीस ठाण्यावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर येथील सराफाच्या मृत्यूनंतर मृतदेह घेऊन शहर पोलीस ठाण्यावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की येथील सराफ गोरख मुंडलिक यांनी पोलिसांसमोर विष प्राशण केले होते. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सात दिवसांनंतर त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यानंतर राज्यभरातील सराफांनी व सराफ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंडलिक यांची अंत्ययात्रा श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यावर नेली. पोलीस ठाण्याच्या समोर मृतदेहासह ठिय्या आंदोलन केले होते. पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. 


Loading...
त्यानंतर मुंडलिक यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यानंतर पोलिसांनी भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रकाश चित्ते, सोनार समाजाचे जिल्हाध्यक्ष संतोष वर्मा, अनिरुद्ध महाले, मनोज चिंतामणी, कुणाल कारंडे व इतरांविरुद्ध रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची अडवणूक केल्याचा व प्रेताची विटंबना केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.