आ.मोनिका राजळेंनी न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवगाव तालुक्यातील पश्चिम भागातील वडुले खुर्द, वाघोली, निंबे व नांदूरविहिरे या चार गावांसाठी स्वतंत्र पाणी योजना मंजूर व्हावी, यासाठी जि. प. सदस्या हर्षदाताई काकडे यांनी वेळोवेळी आंदोलने करून योजनेला मंजुरी मिळवली. त्या काळात आमदार मोनिका राजळे या आमदारही नव्हत्या. त्यामुळे, न केलेल्या कामाचे श्रेय आमदार राजळे यांनी घेऊ नये, अशी टीका वाघोलीच्या माजी सरपंच मीराताई सुधाकर आल्हाट व कार्यकर्त्यांनी केली आहे. 


प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मीराताई आल्हाट यांनी म्हटले आहे की, वडुले, वाघोली, निंबे व नांदूरविहिरे या गावांना स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राष्ट्रीय पेयजल योजनेतून मंजूर झाल्याचे वृत्तपत्रांतून वाचले. परंतु, वस्तुस्थिती अशी आहे की, जि. प. सदस्या हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखाली सन २०१३ मध्ये या चारही गावांतील ग्रामपंचायतींचे ठराव घेऊन ग्रामस्थांनी जीवन प्राधिकरणाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जी. बी. सागू यांना देऊन घेराव आंदोलन केले होते. 
Loading...

जि. प. सदस्या हर्षदाताई काकडे यांनी नगर जिल्हा परिषदेत ठराव मांडून या चार गावांचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करण्याचा ठराव एकमताने मंजूर करून घेतला होता. . तत्कालीन मुख्यमंत्री, पाणीपुरवठा मंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे जि. प. सदस्या काकडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानंतर, सदर योजनेची व्यवहार्यता तपासणी करण्याचे व मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश केल्याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा विभागाचे कक्ष अधिकारी रा. अ. साबणे यांनी दि. २६ डिसेंबर २०१६ रोजी काढले होते. 

त्यानुसार, योजनेस मंज़ुरी मिळाली; परंतु, निधीअभावी ही योजना रखडली होती. आता मुख्यमंत्री पेयजल योजनेऐवजी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत या योजनेसाठी निधी मंजूर झालेला आहे. पंरतु, जि. प. सदस्या काकडे यांनी या चार गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी पाठपुरावा केल्याने या योजनेचे खरे श्रेय काकडे यांचेच आहे. पंरतु, आ. राजळे या न केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत, अशी टीका मीराताई आल्हाट यांनी केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.