आता सानिया मिर्झावर बनणार बायोपिक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आजकाल बॉलिवूडमध्ये खेळाडूंवर बायोपिक बनवण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. सर्वात आधी महेंद्र सिंह धोनीवर बायोपिक बनवण्यात आला. त्यानंतर भारतीय हॉकी टीमचा माजी कर्णधार संदीप सिंग यांच्या आयुष्यावर सूरमाची निर्मिती झाली. 

Loading...
त्याशिवाय श्रद्धा कपूर बँडमिंटन खेळाडू सायना नेहवालच्या भूमिकेत, तर हर्षवर्धन कपूर माजी प्रोफेशनल शूटर अभिनव बिंद्रा यांच्या व्यक्तिरेखेत दिसून येणार आहेत.. आता सूत्रांच्या म्हणण्यानुसार, फिल्म निर्माते रॉनी स्क्रूवालाने भारताची टेनिस खेळाडू सानिया मिर्झावर बायोपिक बनवण्यासाठी हक्क खरेदी केले आहेत. 

अनेक लोकांना सानिया मिर्झावर चित्रपट बनवण्याची इच्छा होती, परंतु अखेरीस या चित्रपटाचे हक्क रॉनी यांना मिळाले आहेत. या चित्रपटामध्ये सानियाचे व्यावसायिक व खासगी आयुष्य दाखवण्यात येणार आहे. लवकरच या चित्रपटासाठी डायरेक्टरची निवड करण्यात येणार आहे व त्यानंतर यासाठी कास्टिंगदेखील सुरू होईल.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.