पंतप्रधान आवास योजनेमध्ये घर खरेदीनंतर ते विकण्यास पाच वर्षे बंदी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पंतप्रधान आवास योजनेखाली जे घर खरेदी करणार असतील, त्यांना पाच वर्षे होईपर्यंत ते घर विकता येणार नाही. हा पाच वर्षांचा कालावधी हा लॉक इन पिरिएड असणार आहे. या धोरणाबाबत एकमत झाले असून लवकरच त्याबाबतची घोषणा होणार आहे.

या योजनेचा फायदा खऱ्या लाभार्थींना व्हावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे. सध्या पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत ५४ लाख घरांसाठी मंजुरी मिळाली आहे. त्यामधील सुमारे ८ लाख घरे बांधून तयारही असल्याचे सूत्रांनी सांगितले. या योजनेचा अयोग्य प्रकारे वापर होऊ शकतो, असे सरकारला वाटते.या योजनेतील घरे प्रॉपर्टी एजंटंसद्वारे विकली जाऊ शकतात.

Loading...

यामुळे कर्जामध्ये देण्यात येणारी सवलत कूचकामी ठरू शकते. या संबंधात अर्थ मंत्रालयाच्या एका उच्चाधिकाऱ्याने सांगितले की, ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही, त्यांना घर मिळावे, असा सरकारचा उद्देश आहे. यामुळेच सरकार कर्जावर इतकी अधिक सवलत देत आहे.मात्र, त्या सवलतीचा जर दुरुपयोग झाला तर मग या योजनेला अर्थच उरणार नाही. यासाठी तो दुरुपयोग रोखला जावा व म्हणून ठोस धोरणात्मक पाऊल उचलले जाण्याची गरज आहे.

योजनेचा आढावा घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत पंतप्रधान कार्यालय, अर्थ मंत्रालय व अन्य संबंधित मंत्रालय यातील उच्च अधिकारी सहभागी होते. या बैठकीत पंतप्रधान आवास योजनेमध्ये घर खरेदीनंतर लॉक इन पिरिएड जारी करण्याची शिफारस करण्यात आली. यासाठी पंतप्रधान कार्यालयाने तत्त्वत: मंजुरी दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.