९६ वर्षापासून प्रलंबित असलेल्या रेल्वे मार्गासाठी आत्मदहनाचा इशारा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सन १९२२ मध्ये ब्रिटिशांनी मंजूरी देऊनही तब्बल ९६ वर्षापासून प्रलंबित असलेल्या बेलापुर-परळी रेल्वे मार्गासाठी २० ऑगस्ट रोजी मंत्रालय,मुंबई येथे आत्मदहन करणार असल्याचा इशारा कुकाणा येथील रितेश भंडारी यांच्यासह अन्य सहा जणांनी दिला आहे. 

Loading...
या मार्गाला लागणारी जमीन अधिग्रहण करुन माती भराव पूर्ण करण्यात आला. जमीनधारकांना मोबदला अदा करण्यात आलेला आहे. डिसेंबर २०१७ मध्ये उपोषण करण्यात आले. यावेळी मुंबई येथील रेल्वेचे उप महाप्रबंधक दिनेश वरीष्ठ यांनी जूनपयंर्त सर्वेक्षण पूर्ण करुन अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर करण्याचे लेखी आश्वासन दिले. 

तसेच मुख्यमंत्री यांनीही या मार्गाला केंद्राकडून मंजूरी मिळणेकामी सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडले, परंतु मुदत संपुन महिना लोटुनही सर्वे प्रगतीपथावर असल्याचे उत्तर मुख्य प्रशासकिय अधिकारी मुंबई यांनी दिले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.