आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पहिल्या सुवर्णपदकाला गवसणी घातली !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीपटू बजरंग पुनियाने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. बजरंगने जपानच्या तकातानीला 10-8 ने धोबीपछाड देत सुवर्णपदक पटकावले आहे.
Loading...

बजरंग पुनिया आणि आणि जपानच्या तकातानीमध्ये रोमहर्षक सामना रंगला. पण बजरंग पुनियाने जबरदस्ती खेळी केली. तकातानीचा प्रत्येक डाव त्याने मोडीत काढला. बजरंगने 8-6 अशी आघाडी कायम ठेवली होती. बजरंगने तकातानीला आस्मान दाखवत दोन अंकाची कमाई करत सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या विजयामुळे आशिया क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे.

याआधी भारतीय महिला टीमने 'विजयी' सलामी दिली. महिला टीमने जपानला 43-12 अशा फरकाने पराभूत केलं. त्यानंतर नेमबाजीत भारताला पहिले पदक मिळाले. 10 मीटर एअर रायफल मिक्स्डमध्ये अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार या जोडीने कास्यपदकाची कमाई केली. अपूर्वी चंदेला आणि रवी कुमारने 429.9 अंक मिळवून कास्यपदक पटकावले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.