नगर -औरंगाबाद महामार्गावर जीपच्या अपघातात ६ महिला जखमी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील जेऊर बा. येथे नगर -औरंगाबाद महामार्गावर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपला झालेल्या अपघातात चालकासह ५ ते ६ महिला जखमी झाल्या. जखमींवर नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


Loading...
हा अपघात शनिवार, दि.१८ ऑगस्ट रोजी जेऊर येथे घडला. याबाबतची माहिती अशी की, शनिवार दि.१८ ऑगस्ट रोजी जेऊर येथील महावितरण कंपनीच्या चौकात बहिरवाडीकडे वळत असताना जीप क्र. एम. एच. १७ सी. ८५३८ पलटी झाली. या जीपमध्ये शेतमजुरी करणाऱ्या महिला होत्या. अपघातामध्ये चालकासह ५ ते ६ महिला जखमी झाल्या आहेत. 

ही जीप औरंगाबादकडून नगरकडे येत होती. वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप पलटी झाली. जखमींवर नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. नेवासा तालुक्यातील महिला मोठ्या प्रमाणात शेतमजुरीसाठी जेऊर परिसरात येत असतात. 


अपघातातील जखमी हे हंडी निमगावचे रहिवासी असल्याचे समजते. अपघातग्रस्तांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील चौकात गतिरोधक बसविण्याची मागणी जेऊर ग्रामस्थांनी अनेक वेळा केलेली आहे. 


ग्रामसभेतही या विषयावर चर्चा करून गतिरोधक बसविण्यासाठी संबंधितांशी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. या चौकात नेहमीच लहान -मोठे अपघात होत असून, आतापर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे..

Powered by Blogger.