वडीलांना ठार मारणाऱ्या मुलास श्रीरामपुरात अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बापाचा गळा आवळून खून करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील वडगाव धायरी येथील आरोपीस श्रीरामपूर शहर पोलसांनी पकडले आहे.याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, की गुरुवारी (दि. १६) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट हे त्यांचे कर्मचारी अन्सार शेख, बिरप्पा करमल, साईनाथ राशिनकर, साळवे यांच्यासह पायी गस्त घालत होते.


Loading...
यादरम्यान बाबासाहेब आंबेडकर गार्डनच्या बाजुने एक इसम संशयितरित्या फिरताना त्यांना दिसून आला. त्याला अटकले असता तो वेगाने चालू लागला. संशय बळावल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. म्हणून त्याला सखोल चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्याने त्याचे नाव गणपत बापू शेडगे असल्याचे सांगितले. 

चौकशी केली असता त्याने सांगितले, की दि. ९ ऑगस्ट रोजी त्याने त्याचे साथीदार अर्जुन कांबळे व किसन शिंदे (दोघे रा. तुकाईनगर, वडगाव, ता. हवेली, जि. पुणे) यांच्यासमवेत रात्री २ वाजण्याच्या सुमारास त्याचे वडील बापू अशोक शेडगे यांचा दोरीने गळा आवळून खून केला व हातपाय बांधून कॅनॉलच्या पाण्यात टाकून दिले. 


यावरून पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या हडपसर पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता हा खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे समजले व हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंभार यांच्याकडून मयताच्या नावाची खात्री करण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी आरोपीस हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Powered by Blogger.