पुढील महापौर शिवसेनेचाच असेल - अनिल राठोड.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना मनपाच्या माध्यमातून सक्षमपणे राबविल्या आहेत. त्यामुळे शहरात विविध प्रकल्प उभे राहत आहेत. महापौर सुरेखा कदम चांगले काम करीत आहेत. खरा विकास शिवसेनेने उभा केला असून, आमचे नगरसेवक गरज असेल तेथेच कामे करून शहराचा विकास करीत आहेत. गोरगरीबांना सन्मानाने जगता यावे, यासाठी बेघरांना निवारा देण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे. पुढील महापौर शिवसेनेचाच असेल, असे प्रतिपादन माजी आमदार अनिल राठोड यांनी केले.


Loading...
अ.नगर मनपाच्या वतीने काटवन खंडोबा रोड परिसरात केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत शहरी बेघरांना निवारा प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन माजी आमदार अनिल राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी महापौर सुरेखा कदम, सभागृहनेते गणेश कवडे, महिला बालकल्याणच्या उपसभापती सुनीता मुदगल, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, गटनेते संजय शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शीलाताई शिंदे, नगरसेवक अनिल शिंदे, सचिन जाधव, नगरसेविका सुवर्णा जाधव, संभाजी कदम, दत्ता जाधव, काका शेळके, आकाश कातोरे, हर्षवर्धन कोतकर, आर. जी. मेहेत्रे, के. डी. खानदेशी, अशोक आगरकर, ज्ञानेश्­वर कविटकर, मधुकर ओहोळ, अभिषेक भोसले, पियुष कोथिंबिरे, संतोष तनपुरे, ठेकेदार मेहेर आदी उपस्थित होते.


महापौर सुरेखा कदम म्हणाल्या की, मनपाने नगर शहरात रात्री फूटपाथवर राहणाऱ्यांचा सर्व्हे केला होता. यामध्ये १०४ कुटुंबे आढळून आली. त्यांना निवारा मिळावा, यासाठी आम्ही केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून १ कोटी ५७ रुपये मंजूर करून घेतले. शहरी बेघरांना निवारा प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पात सर्व सुविधा उपलब्ध असतील. सेवाभावी संस्थेची यावर नेमणूक केली जाईल. शासनाची यासाठी मदत मिळणार असल्याचे सांगितले.

Powered by Blogger.