पाथर्डीतील 'त्या' खुनाचे गुढ उकलले, साक्षीदारच निघाला आरोपी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :खुनाच्या घटनेतील साक्षीदाराच खरा आरोपी असल्याची घटना पाथर्डी पोलिसांनी उघडकीस आणली आहे. चिचोंडी येथील केशव जऱ्हाड यांच्या खुनाच्या घटनेत ही बाब समोर आली आहे. खून करून स्वत: साक्षीदार असल्याचे भासवणाऱ्या आरोपीस अखेर पोलिसांनी गजाआड केले आहे. 
Loading...

२३ जुलै २०१८ रोजी केशव दशरथ जऱ्हाड (५० वर्षे रा, चिंचोडी) यांचा सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास खून झाला होता. मयताचे पुतणे प्रमोद जऱ्हाड यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. संजय पेंटर ऊर्फ संजय पेत्रस भिंगारदिवे यांना पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात अटक केली होती. 


खुनाची घटना घडल्याचा पहिला फोन अरुण तुपे याने फिर्यादीच्या भावाला केला होता. केशव जऱ्हाड यांचा खून संजय पेंटरने केल्याची माहिती दिली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक यशवंत राक्षे यांच्याकडे खुनाचा तपास होता. पोलिस अधीक्षक मंदार जवळे, पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या नेतृत्वाखाली तपास केला. 


पोलिस कर्मचारी देवीदास तांदळे व नितीन दराडे यांनी राक्षे यांना मदत केली. फिर्यादी, आरोपी व साक्षीदार यांच्या जबाबामध्ये तफावत आढळल्याने पोलिसांनी अरुण हरिभाऊ तुपे (वय-४० रा. चिचोंडी ) याच्याकडे चौकशी केली. त्यामध्ये केशव जऱ्हाड यांचा खून अरुण तुपे याने केल्याचे उघड झाले. 


यातील पूर्वी अटक केलेला संशयित संजय पेंटर याने तुपे याला जऱ्हाड यांचा खून करताना पाहिले होते. त्यामुळे तुपे याने संजय पेंटरला त्यांच्या घरात जाऊन चाकून वार केले होते. तुपे याच्यावर खुनाचा गुन्हा तर आहेच. शिवाय संजय पेंटर याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा वाढविण्यात आला आहे. पोलिसांनी खुनाचा तपास करून तुपे याला अटक केली. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.