सर्वसामान्यांना अपेक्षित बदल विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत दिसणार - नीलेश लंके


दैनिक प्रभात अहमदनगर :- पक्ष वेगवेगळे अन्‌ नेते अनेक असले, तरी पारनेर तालुक्‍यात गेली 14 वर्ष आमदार विजय औटी यांनी “ऍडजेस्टमेंट’चे राजकारण केले. त्यातून एकमेकांचे हीत जोपासले गेले आहे. या ऍडजेस्टमेंटला आता पारनेरकर वैतागले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अपेक्षित असलेला बदल विधानसभेच्या 2019 मधील निवडणुकीत होणार असल्याचा विश्‍वास शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी व्यक्‍त केला.

श्री. लंके यांनी दैनिक प्रभात कार्यालयास आज सदिच्छा भेट दिली. त्या वेळी त्यांनी “प्रभात’च्या टीमबरोबर संवाद साधला. ते म्हणाले, की तालुक्‍यात आ. औटी यांनी नात्यागात्याचे व सोयीचे राजकारण केले. आमदारकीच्या माध्यमातून विकासकामे केल्याचा दावा ते करतात; परंतु शासकीय योजना वगळता वेगळी कोणती ठोस कामे त्यांनी केली, हे सांगावे. रस्ते आणि सभामंडप सोडले, तर कामे दिसत नाही. त्यात रस्त्यांची कामे पाहिल्यानंतर खड्डयात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच कळत नाही. 


Loading...
जलयुक्‍त शिवार योजनेतील कामेदेखील तालुका दुष्काळी असल्याने झाली आहेत. त्यात आमदारांचे कोणतेही योगदान नाही. उलट, विकासकामे होणार नाहीत, याची काळजी हे आमदार घेत आले आहेत. तालुक्‍यात एकही वेगळे व ठोस काम आमदारांना करता आले नाही. केवळ राजकीय ऍडजेस्टमेंट अन्‌ विकासाच्या गप्पा तेवढ्याच त्यांनी आजवर केल्या आहेत.

तालुक्‍याची कामधेनू म्हणून ओळख असलेला पारनेर कारखाना चालू करण्यासाठी त्यांनी कधीच प्रयत्न केले नाही. सुपे येथील औद्योगिक वसाहत वाढविण्यासाठी अन्‌ मोठ्या कंपन्या आणण्यासाठी आमदारांनी काय योगदान दिले, असा सवाल लंके यांनी केला. मोठे उद्योग आले असते, तर तालुक्‍यातील बेरोजगारांना रोजगार मिळाला असता; पण तेही त्यांनी होऊ दिले नाही. त

त्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी मोठ्या कंपन्या आणण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा यांनी विरोध केला. पाचपुतेंना त्याचे श्रेय मिळेल, म्हणून यांनी कंपन्यांना विरोध करून पारनेर तालुक्‍याचे मोठे नुकसान केले. त्यांच्यामुळेच सुप्याची एमआयडीसी वाढली नाही. पारनेरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय नाही, की अन्य उच्च शिक्षणाची सुविधा निर्माण केली नाही. 

पाण्याचा प्रश्‍नदेखील त्यांना सोडविता आला नाही. तालुक्‍यात 14 गावेच कालव्याच्या लाभक्षेत्रात आहेत. उर्वरित तालुका आजही दुष्काळी आहे. उन्हाळ्यात टॅंकरनेच पाणीपुरवठा होतो. टॅंकरमुक्‍त तालुका करता आला नाही. त्यामुळे आज तालुका विकासपासून वंचित राहिला असल्याची घणाघाती टीका लंके यांनी वारंवार औटी यांचा नामोल्लेख करून केली.

ते म्हणाले, “”तालुक्‍यात शिवसेना एकदम वाढली नाही. त्यासाठी माझे परिश्रम आहेत. संघटना मजबूत होती, म्हणून औटी आमदार झाले. विकासकामे तर आवश्‍यक आहेत; पण त्याबरोबर पक्षसंघटन महत्वाचे आहे आणि हे संघटन मी उभे केले होते. सर्वसामान्यांचे लहान-लहान प्रश्‍न व समस्या सोडविल्या. लोक आमदारांकडे कामासाठी जाण्याऐवजी माझ्याकडून कामे करून घेत होते. 

कारण आमदारांकडे जाणाऱ्याचा अपमान होत होता. आमदार कधीही लोकांशी व्यवस्थित बोलत नव्हते. स्वाभिमानाची ऐशी तैसीच आमदार करीत होते. त्यामुळे काम घेवून जाण्यास लोक घाबरतात. सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक केली, त्यांचे लहान-सहान प्रश्‍न मार्गी लावले, तरी ते खूश होतात. त्यामुळे मी तळागाळातील झोपडीत राहणाऱ्यांचे प्रश्‍न सोडवित आलो आहे. 

आज सर्वसामान्यांशी माझी नाळ जोडली गेली आहे. राज्यातील इतर लोकप्रतिनिधी लोकांची अडवणूक करीत नाहीत; पण राज्यात पहिला लोकप्रतिनिधी असा आहे, की ज्याने लोकांची अडवणूक केली. त्यांची कामे होऊ नयेत, म्हणून पत्र दिले. त्याविरोधात मला तीन दिवस उपोषण करावे लागले. 214 जणांचे प्रस्ताव मंजूर करावे लागले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.