अहमदनगर सीए.शाखेतर्फे सीए.उत्तीर्ण यशस्वी विदयार्थ्यांचा सत्कार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आजच्या डिजिटल व्यवहारी युगात सीएची जबाबदारी वाढली असून या क्षेत्राला वेगळे स्थान प्राप्त झाले आहे.सीए होण्याकडे युवक युवतींचा कल वाढतच आहे अशा गुणवंतांचा सत्कार करण्याचा त्यांना प्रोत्साहन देण्याचा संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद असून नवोदित सीए.नी सामाजिक भान जोपासत प्रामाणिक पणे सेवा दिल्यास ते नक्कीच यशस्वी होतील असे मत सीए.एस.बी.झावरे यांनी व्यक्त केले.

Loading...
अहमदनगर सीए.शाखेतर्फे सीए. उत्तीर्ण यशस्वी विदयार्थ्यांचा पुण्याचे दि.इन्स्टीटयुट ऑफ चार्टड अकौंटंटसचे सदस्य सीए.एस.बी.झावरे यांच्या हस्ते व सीए.चंद्रशेखर चितळे,सीए.यशवंत कासार यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.यावेळी सीए.नगर शाखेचे अध्यक्ष सीए. ज्ञानेश कुलकर्णी,उपाध्यक्ष सीए.डॉ.प्रशांत बोरा,सचिव सीए. किरण भंडारी, सीए. सानित मुथा,माजी अध्यक्ष सीए. सुशील जैन, सीए. मोहन बरमेचा,उपस्थित होते.

सीए.चंद्रशेखर चितळे यांनी ‘टँक्स ऑडीट’ या विषयावर व सीए.’यशवंत कासार’ यांनी जी.एस.टी.विषयी मार्गदर्शन केले.प्रास्ताविक व स्वागत नगर शाखेचे अध्यक्ष सीए.ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले व आज पर्यंत झालेल्या व होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानित मुथा यांनी केले.तर आभार सीए.डॉ.परेश बोरा यांनी मानले.कार्यक्रमास ज्येष्ठ सदस्य सीए. पी.बी.बोरा, सीए. एम.के.गांधी, सीए. नंदलाल पोपटाणी, सीए.नंदकिशोर मुंदडा,सीए विदयार्थी,पालक उपस्थित होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.