जामखेड गोळीबार प्रकरणी एका महिलेस अटक


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड शहरात झालेल्या गोळीबार प्रकरणात जामखेड पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका महिला आरोपीस बंदूकीसह अटक करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह त्याचे साथीदार अजूनही फरार असून, त्यांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Loading...
याबाबत सविस्तर असे की, बुधवार दि.१५ ऑगस्ट रोजी जामखेड एसटी आगाराचे वाहक सुग्रीव गहिनाथ जायभायला रात्री सचिन आजबे याचा फोन आला व त्याने नगररस्त्यावरील एका धाब्यावर बोलवले. त्यामुळे फिर्यादी सुग्रीव जायभाय हे तेथे गेले. तेथे सचिन आजबे सह इतर अनोळखी चारजण होते.

यावेळी सचिन आजबे याने सुग्रीव जायभाय व आजबे यांच्यात उसन्या पैशावरून वाद झाला.या वादातून जायभाय यास चार जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सचिन आजबे याने त्याच्या जवळील पिस्तूलातून गोळी झाडली ती पायाच्या मांडीवर लागून आरपार गेली. यानंतर ते सर्वजण पळून गेले. जामखेड पोलिसांत सुग्रीव जायभाय याने दिल्यावरून सचिन आजबे व इतर अनोळखी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान या प्रकरणात जामखेड पोलीसांनी आज केलेल्या कारवाईत राणी संजय ढेपे (वय २८ वर्ष रा.महारुळी ता.जामखेड ) हल्ली राहणार मुंजोबा गल्ली, जामखेड या महिला आरोपीस पुरावे नष्ट करण्यास मदत केल्याप्रकरणी अटक केली.

या प्रकरणातील फरार मुख्य आरोपी सचिन आजबे व त्याच्या साथीदारांना अटक करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असली तरी अजूनही आरोपींचे धागेदोरे पोलीसांच्या हाती लागलेले नाहीत. पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार हे याबाबत अधिक तपास करत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.