राहाता तालुक्यातील तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहाता तालुक्यातील लोणी बुद्रूक येथे एका तरुणाने लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ च्या दरम्यान घडली. अशोक छबुराव कदम (वय ३२, पाथरे बुद्रूक) असे मृताचे नाव आहे. अशोक पेंटर म्हणून मजुरीचे काम करत होता.


Loading...
लोणी बुद्रूक-पाथरे रस्त्याच्या कडेला असलेल्या लोणी पाणीपुरवठा योजनेच्या पाॅवर ग्रीड हाऊसजवळ असलेल्या लोखंडी अँगलला त्याने गळफास घेतला. बाबासाहेब म्हस्के यांनी दिलेल्या खबरीवरून लोणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला. त्याच्या आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.