मढी देवस्थान अध्यक्ष, विश्वस्त व माजी सरपंचाकडून जातिवाचक शिवीगाळ.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मढी देवस्थानच्या विश्वस्त मंडळातील वादातून देवस्थानचे अध्यक्ष,विश्वस्त व माजी सरपंचाविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ करुन दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या घटनेचा गुरुवारी पोलिसांत गुन्हा नोंदविला आहे. देवस्थान समितीचा वाद आणखीच पेटला आहे. 
Loading...

मढी देवस्थान समितीत पदाधिकारी निवडीचा वाद धर्मादाय आयुक्तांकडे सुरु आहे. विश्वस्त मंडळ कोणतेही निवडले तरी वाद हा ठरलेलाच आहे. मढी येथील कानिफनाथ देवस्थानचे विश्वस्त मधुकर साळवे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. दि.१३ जून २०१८ रोजी साळवे यांना देवस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब मरकड, विश्वस्त सुधीर भाऊराव मरकड व माजी सरपंच देवीदास विनायक मरकड यांनी जातिवाचक शिवीगाळ करुन दमदाटी केली. 


अशी तक्रार मधुकर साळवे यांनी पोलिसांत गुरुवारी दाखल केली आहे. . पाथर्डी-शेवगावचे पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे यांनी गुरुवारी मढी गावाला भेट दिली. गुन्ह्याची माहिती घेतली. विश्वस्तामधील वादाने आता वेगळेच वळण घेतले आहे. देवस्थानच्या अध्यक्ष व विश्वस्तासह माजी सरपंचावर गुन्हा दाखल झाला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.