माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व्हेंटिलेटवर


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांना व्हेटिलेटवर ठेवण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सायंकाळी एम्समध्ये जावून वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Loading...
गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती जास्त बिघडली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. गृहमंत्री राजनाथसिंग आणि स्मृती इराणी यांनीही एम्समध्ये जावून डॉक्टरांशी चर्चा केली. वाजपेयींना 11 जून ला एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर एम्समध्येच उपचार सुरू आहेत.

94 वर्षांचे वाजपेयी हे गेल्या काही वर्षांपासून डिमेंशिया ने आजारी आहेत. एम्स चे संचालक डॉ. रणदिप गुलेरिया यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची टीम वाजपेयी यांच्यावर उपचार करत आहे. या आजारात स्मृती पूर्णपणे जात असल्याने गेल्या काही वर्षांपासून वाजपेयी सार्वजनिक जीवनापासून अलिप्त आहेत.प्रकृती अस्वस्थतेमुळं वाजपेयी यांनी सार्वजनिक जिवनातून निवृत्ती घेतली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.